कर्जमाफीवरून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध, जप्तीचे नोटिसा बुडवल्या रामकुंडात
नाशिक, 19 मार्च (हिं.स.)। - गुढी नवीन वर्षाची परंतु शेतकऱ्यांच्या मागील अनेक वर्षाच्या बँकांच्या कर्जाच्या दुःखाची साजरी करून बँकांनी पाठविलेल्या नोटिसा या नाशिक शहरातील रामकुंड या ठिकाणी पाण्यामध्ये बुडवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे सर
Farmers-protest-against


Farmers-protest-against


नाशिक, 19 मार्च (हिं.स.)।

- गुढी नवीन वर्षाची परंतु शेतकऱ्यांच्या मागील अनेक वर्षाच्या बँकांच्या कर्जाच्या दुःखाची साजरी करून बँकांनी पाठविलेल्या नोटिसा या नाशिक शहरातील रामकुंड या ठिकाणी पाण्यामध्ये बुडवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे

सरकारने शेतकऱ्याला दोन लाखाची कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्यांच्या दुःखावरती मीठच नाही तर मिरची सोडली आहे अशी परिस्थिती आज तरी शेतकऱ्यांसमोर दिसत आहे ! सरकारने शेतकऱ्याला पात्र व अपात्र असा निकष लावून दोन लाख रुपये जाहीर केले परंतु यामागे सरकारने फक्त बँका वाचवल्या असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले. बँकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या कारवाया करून शेतकऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य खराब केले आहे. या विरोधात गेल्या 1022 दिवसापासून शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू आहे. तरी सरकार अजून दखल घेत नाही आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमुक्ती समन्वय समितीच्या वतीने प्रथम बँकांनी पाठवलेल्या कर्जाच्या नोटिसा रामकुंडात बुडवून निषेध करण्यात आला त्यानंतर आमदारांच्या दारापुढे जाऊन ढोल ताशा वाजवून निषेध करण्यात आला शेतकरी आंदोलन स्थळावर सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.

त्यानंतर सरकारने आम्हाला गाजर दाखवले म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात गाजर आंदोलन देखील केले तरी सरकार अजून दखल घेत नाही रामाचे नाव घेऊन सरकार सत्तेवर आले याच राम राज्याच्या काळामध्ये गुढीची प्रथा चालू झाली आम्ही आज आंदोलन स्थळावर नवीन वर्षाच्या निमित्ताने गुढी उभारून शेतकऱ्यांची कैफियत सरकार पुढे दुःखाची गुढी उभारून मांडत आहोत तरी या सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा लवकरच सरकारला या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून 56 हजार शेतकरी आणि समितीचे सदस्य सरकारचा निषेध म्हणून डोक्यात काळी टोपी घालून निषेध करतील अशी माहिती समिती अध्यक्ष भगवान बोराडे 938 आदिवासी विकास संस्था समिती अध्यक्ष कैलास बोरसे समिती सदस्य दिलीप पाटील स्वाभिमान भारत पक्ष अध्यक्ष मोती नाना पाटील समिती सदस्य खेमराज कोर यांनी दिली याप्रसंगी सुनील पवार आणि गवई उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande