
जळगाव, 19 मार्च (हिं.स.) साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असते. दिवशी सोन चांदी खरेदी केलं तर शुभ असते, घरात वर्षभर बरकत असते अशी नागरिकांची भावना आहेत. मात्र यंदा सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. प्रति तोळ्याचा भाव अद्यापही दीड लाखांपेक्षा जास्त आहेत त्यामुळे तरीही लोक सोनं खरेदी करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव सराफा बाजारात आज सकाळीच २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ५८ हजार १०५ रुपयांवर पोहोचले. जीएसटीसह हा दर १ लाख ६३ हजार रुपयांवर गेला आहे. सध्या चांदीचा दर विनाजीएसटी २ लाख ५५ हजार रुपये इतका आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोनं ७० हजारापर्यंत महागलं आहे तर चांदीच्या दरात दीड लाखांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या गुडीपाडव्याच्या दिवशी २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ८९९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. गेल्या वर्षभरात सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्याचे सोन्याचे हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.सोन्याचे दर कमी व्हावेत, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. मात्र, यंदाच्या गुढीपाडव्या सोन्याचे दर खूप जास्त असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडल्याचे दिसत आहे.सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. जागतिक पातळीवरील युद्ध परिस्थिती, डॉलरच्या किंमतीत वाढ अशा अनेक गोष्टींमुळे सोन्याचे दर वाढत आहेत.वर्षभरात डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातलं धोरण, रशिया युक्रेन युद्ध याबरोबरच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर