जुळे सोलापुरात शुक्रवारी जागृत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा
सोलापूर, 19 मार्च (हिं.स.)।जुळे सोलापूर परिसरात जागृत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, सेवा आणि परंपरेचा संगम अनुभवण्याची संधी या सोहळ्यात उपलब्ध होणार आहे.
जुळे सोलापुरात शुक्रवारी जागृत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा


सोलापूर, 19 मार्च (हिं.स.)।जुळे सोलापूर परिसरात जागृत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, सेवा आणि परंपरेचा संगम अनुभवण्याची संधी या सोहळ्यात उपलब्ध होणार आहे. शुक्रवार, दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत कलश मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, त्यानंतर बसवराज शास्त्री तीर्थ यांच्या हस्ते होम-हवन पार पडणार आहे. तसेच शिवानंद स्वामी करजगी यांचे आशीर्वाद लाभणार आहेत. दुपारी 12 वाजता आरती व पाळणा सोहळा होणार असून, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ नगर, जुळे सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात हा सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 8 या वेळेत भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी 7 वाजता लक्ष दीपोत्सव व आरती होणार आहे. याबाबतची माहिती स्वामी भक्त युवराज राठोड यांनी प्रसारमाध्यमांना दिली.या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैशाली शहापुरे, चंद्रकांत शहापुरे आणि युवराज राठोड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande