
लातूर, 19 मार्च (हिं.स.)
उदगीर येथील प्रसिद्ध भुईकोट किल्ला येथे उदगीरचे आराध्य दैवत उदागिर बाबांचे आमदार संजय बनसोडे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजा-अर्चा करून मतदार संघातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी उदागिरबाबांच्या चरणी साकडे घातले.
यावेळी अर्चना सतिशगीर गोस्वामी,किरण महाराज, जयेश गोस्वामी महाराज, तेजश गोस्वामी, अमोल भारती, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, नरसिंग शिंदे, शशिकांत बनसोडे, शिवकुमार कांबळे, जवाहरलाल कांबळे, प्रकाश बिरादार, अमोल अनकल्ले आदी उपस्थित होते.
उदागिर बाबा हे या भागातील श्रद्धास्थान असुन त्यांच्या दर्शनासाठी दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घेत असतात मात्र आज गुढी पाडव्यानिमित्त आमदार संजय बनसोडे यांच्या भेटीमुळे या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
दर्शनानंतर आमदार बनसोडे यांनी उपस्थितांशी संवाद साधुन परिसरातील विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेवुन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis