छ. संभाजीनगर - आधुनिक इलेक्ट्रिक वाहन शोरूमचा उद्घाटन सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 19 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील हेमंत शिंदे व पंकज धोबळे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘Simple Store – EV Elite Mobility’ या आधुनिक इलेक्ट्रिक वाहन शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत उ
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील

हेमंत शिंदे व पंकज धोबळे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘Simple Store – EV Elite Mobility’ या आधुनिक इलेक्ट्रिक वाहन शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहतुकीकडे देश वेगाने वाटचाल करत असताना, या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-मोबिलिटी क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. नागरिकांना अत्याधुनिक इलेक्ट्रिक दुचाकी, सेवा सुविधा आणि विश्वासार्ह पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

या नव्या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, प्रदूषण कमी करण्यास मदत आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना मिळेल, असा विश्वास आहे.असे सावे यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande