
लातूर, 19 मार्च (हिं.स.)
औसा मतदारसंघातील लोदगा येथे ‘पाशा पटेल स्किलटेक विद्यापीठ’ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ उभारण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.
या विद्यापीठाच्या माध्यमातून हरित कौशल्य विकासाला चालना देणे, पर्यावरण संतुलित शाश्वत विकास साधणे तसेच बांबू-आधारित शिक्षण, उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मिती यावर विशेष भर दिला जाणार आहे. या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोदगा येथे उभारण्यात येणारे हे विद्यापीठ शाश्वत आणि हरित अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis