विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंबाजोगाई बसस्थानकाचा परिसर केला चकाचक
बीड, 19 मार्च, (हिं.स.)। योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंबाजोगाई बसस्थानकाचा परिसर अवघ्या चकाचक केला. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत महाविद्यालयाच्या
अ


बीड, 19 मार्च, (हिं.स.)। योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंबाजोगाई बसस्थानकाचा परिसर अवघ्या चकाचक केला. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील तब्बल १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी केवळ हातामध्ये झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला नाही, तर बसस्थानक परिसरातील वाढलेली झुडपे आणि अनावश्यक गवत काढून प्रवाशांसाठी हा परिसर सुरक्षित आणि मोकळा केला. या उपक्रमात बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना मोलाची मदत केली. अंबाजोगाई आगार प्रमुख अमर राऊत, स्थानक प्रमुख हरिदास गिरी आणि प्राचार्य रमण देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. प्राध्यापक नारायण सिरसाट आणि शाम गडदे यांच्यासह शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांना याकामी मार्गदर्शन केले. सार्वजनिक मालमत्तेची निगा राखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून ती प्रत्येक सजग नागरिकाची आहे. हा मोलाचा संदेश या तरुण विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून समाजाला दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande