ठाण्यात गुढीपाडव्याला चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष; देवीची भव्य मिरवणूक संपन्न
ठाणे, 19 मार्च, (हिं.स.)। हिंदू नववर्षाचे स्वागत आणि चैत्र वासंतिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे देवीचे मोठ्या जल्लोषात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात आगमन क
ठाणे


ठाणे, 19 मार्च, (हिं.स.)। हिंदू नववर्षाचे स्वागत आणि चैत्र वासंतिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे देवीचे मोठ्या जल्लोषात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि अलोट उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण ठाणे शहर भक्तीमय झाले होते.

मिरवणुकीचे विशेष आकर्षण

*नूतन वर्षाच्या प्रारंभी निघालेल्या या मिरवणुकीत देवीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यामध्ये खालील पथकांचा सहभाग लक्षवेधी ठरला*

* *वारकरी संप्रदाय:* संपूर्ण ठाणे तसेच आळंदी, पंढरपूर येथून आलेले वारकरी पथक टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते.

* *कला व संस्कृती* : मिरवणुकीत ३०० हून अधिक पथकांचा समावेश होता, ज्यामध्ये झांज पथक, बँड आणि दांडपट्टा यांसारख्या साहसी खेळांचे सादरीकरण करण्यात आले.

* *महिला व पुरुषांचा सहभाग* : महिला आणि पुरुषांच्या लेझीम पथकाने मिरवणुकीत रंगत आणली. तसेच, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला भाविकांचे विशेष कौतुक होत होते.

* *ऐतिहासिक वारसा:* मिरवणुकीत घोडेस्वार आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील युवक-युवतींनी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली.

*भक्ती आणि उत्साहाचा संगम*

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीनिमित्त आनंद चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेला हा सोहळा ठाणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. कारण मासुंदा तलावाला केलेल्या विद्युत रोषणाईमुले या जांभळी नाका परिसरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम या मिरवणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, शहर प्रमुख अनिश गाढवे, समन्वयक संजय तरे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, तसेच सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, तसेच महीला आघाडी, युवासेना, युवतीसेना व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande