
राज्यातील आएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण
कोलकाता, 20 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर निवडणूक आयोगाने राज्यातील काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तृणमूल काँग्रेसने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आयोगाने राज्य सरकारशी चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचा तृणमूलचा आरोप आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि वरिष्ठ वकील कल्याण बनर्जी यांनी या प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पक्षकार प्रतिवादी बनवले आहे. वकीलांनी मुख्य न्यायाधीश सुजय पाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर प्रकरणाचा उल्लेख करत याचिकेवर लवकर सुनावणी करण्याची विनंती केली. या प्रकरणाशी संबंधित एका वकीलाने सांगितले की, याचिकेवर पुढील आठवड्याच्या सुरूवातीस सुनावणी होऊ शकते. याचिकेत तबादल्याचा निर्णय घेण्यापूर्वी निर्वाचन आयोगाने राज्य सरकारशी सल्लामसलत का केली नाही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बंगालमध्ये 15 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केवळ काही तासांतच आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महानिदेशक (डीजीपी) यांसह अनेक वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी 294 जागांसाठी 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 23 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिल रोजी होईल. मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी