पुणे - मेट्रो मार्गिकेसाठी पीएमआरडीए ॲक्शन मोडवर
पुणे, 21 मार्च (हिं.स.)। हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पी
Metro Train


पुणे, 21 मार्च (हिं.स.)।

हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आले आहे. मेट्रो भवन प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यात मेट्रो मार्गिकेची प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेची पाहणी करून प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. चौधरी यांनी या मार्गिकेवरील २३ स्थानकांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते.

‘कामाचा वेग वाढवताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका,’ अशी सूचना चौधरी यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी २३.२ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली. केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता, त्यांनी प्रत्यक्ष कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची सद्यस्थिती जाणून घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande