
सिंधुदुर्ग, 21 मार्च, (हिं. स.) : सिंधुदुर्ग श्री राधाकृष्ण संगीत साधना संस्थेतर्फे आजगाव येथील स्वयंभू कला क्रीडा मंडळाच्या सहकार्याने राधाकृष्ण चषक सांगितिक महोत्सवाचे आयोजन एप्रिलमध्ये करण्यात आले आहे.
या अंतर्गत शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल) व सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा दि. २५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. कोकणातील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे आठवे पर्व आहे.
यावर्षी सिंधुदुर्ग, रत्नागिरीसोबतच गोवा राज्यातील निवासी स्पर्धकांसाठी स्पर्धा खुली केली आहे. स्पर्धेची सर्व नियमावली गूगल फॉर्ममध्ये वाचावयास मिळेल. इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गायन स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंक -
https://forms.gle/98vDzsJuNm7Y9xuy8
साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेसाठी लिंक -
https://forms.gle/JqgyhqG9PxjkYb1j6
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी