
लातूर, 21 मार्च (हिं.स.)।
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान या लेखाशीर्षातून निलंगा मतदारसंघातील विविध गावांमधील स्मशानभूमी विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
गावांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, यासाठी शासन तसेच मंत्री महोदयांशी सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis