नाशिक - बेमोसमी पावसामुळे सात हजार हेक्टर शेतीचे नुकसान
नाशिक, 21 मार्च, (हिं.स.) - जिल्ह्यामध्ये लागोपाठ दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे सुमारे सात हजार 54 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून सगळ्यात जास्त फटका कांदा पिकाला बसला आहे. याबाबत पाच तालुक्यांचा अहवाल हा तातडीने कृषी विभागाने वरिष्ठांकडे पाठविण
School Education Minister


नाशिक, 21 मार्च, (हिं.स.) - जिल्ह्यामध्ये लागोपाठ दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे सुमारे सात हजार 54 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून सगळ्यात जास्त फटका कांदा पिकाला बसला आहे. याबाबत पाच तालुक्यांचा अहवाल हा तातडीने कृषी विभागाने वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यात बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस गारपिटीसह बे मोसमी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण सात हजार 54 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. त्यामध्ये मालेगाव 3311 सटाणा १६७३ नांदगाव 897 निफाड 622 सिन्नर 551 हेक्टर क्षेत्राचा सहभाग आहे यामध्ये सगळ्यात जास्त कांदा पिकाला फटका बसला असून 4482 हेक्टर जमिनीवरील कांदा पिक हे उध्वस्त झाले आहे. त्यानंतर डाळिंब पिकाला फटका बसला असून 1377 हेक्टर गहू 720 मका 300 द्राक्ष 109 भाजीपाला 52 सीताफळ एक हेक्टर जमिनीवर नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी देताना सांगितले की या सगळ्या बाधित पिकांचा प्राथमिक अंदाज आणि त्यावरून केलेले अहवाल हा सर्व वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande