
लातूर, 22 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चर्मकार समाजातील कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 50 टक्के अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग खुला होणार आहे.
या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमार्फत ₹50,000 पर्यंत प्रकल्प गुंतवणूक मंजूर करण्यात येणार असून, त्यावर शासनाकडून 50% अनुदान (कमाल ₹20,000) दिले जाणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी कर्जाच्या स्वरूपात परत करायची आहे.
ही योजना चर्मकार समाजातील युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी ठरणार असून, त्यांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis