दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई, 22 मार्च (हिं.स.) - ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत दत्ताजी म
दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


मुंबई, 22 मार्च (हिं.स.) - ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत दत्ताजी मेघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, दत्ताजी मेघे यांनी विदर्भाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे खुली झाली. एक अनुभवी संसदपटू आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दिग्गज नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दत्ताजी मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande