मुंबईत होणार 'छावा'चे महाअधिवेशन
राज्यस्तरीय बैठकीत निर्णय नाशिक, 22 मार्च (हिं.स.)। : येथील ग्रामदैवत कालिकामाता मंदिरातील सभागृहामध्ये छावा क्रांतिवीर सेनेची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. यात संघटनेच्या आगामी राष्ट्रीय महाअधिवेशनाबाबत चर्चा होऊन ते मुंबईमध्ये आयोजित करण्याचा
Chhava' general convention


राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

नाशिक, 22 मार्च (हिं.स.)। : येथील ग्रामदैवत कालिकामाता मंदिरातील सभागृहामध्ये छावा क्रांतिवीर सेनेची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. यात संघटनेच्या आगामी राष्ट्रीय महाअधिवेशनाबाबत चर्चा होऊन ते मुंबईमध्ये आयोजित करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश कार्यकारिणीतील शिवाजीराजे मोरे, दिनकर कोतकर, अनिल राऊत, नितीन शिंदे, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोखे, आशिष हिरे, सुभाष गायकर, गणेश माने, हर्षद भोसले, गिरीश आहेर, गोरख संत, मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक निर्णय घेण्यात आले. गायकर यांनी, एक महिन्यात सर्व जिल्ह्यांचा दौरा करून संघटन बांधणी अधिक मजबूत करण्याबरोबरच अधिवेशनाची जिल्हानिहाय तयारी करण्याचे आवाहन केले. शेतकरी, सहकार, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी व वाढता भ्रष्टाचार या क्षेत्रांतील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार असून, राज्यभर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी संघटनावाढ, अधिवेशन तयारी, आंदोलनाबाबत सूचना मांडल्या. नवनाथ वैराळ, अविनाश शिंदे, युवराज घाडगे, दिनेश जाधव, प्रकाश सोळंके, संदीप राऊत, विठ्ठल भुजाडे, सागर जाधव, बालाजी ढगे, गोरख आहेर, राहुल चाळक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande