भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन
22 नागपूर, 22 मार्च (हिं.स.) : विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी रविवारी रात्री नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या मागे सागर व समीर ही दोन मुले, सुना. नातवंडे असा आप्त परिवार
दत्ता मेघे


22 नागपूर, 22 मार्च (हिं.स.) : विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी रविवारी रात्री नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या मागे सागर व समीर ही दोन मुले, सुना. नातवंडे असा आप्त परिवार आहे.

मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला. ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पांडे लेआऊट येथील निवासस्थानी चाहत्यांनी एकच गर्दी केली.

गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षात केली. त्यांनी वर्धा मतदार लोकसभा मतदार संघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. ते ३ वेळा विधान परिषद सदस्यही होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा भाग होते. परंतु त्यापूर्वी १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित १९९१ मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.

दत्ता मेघेच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नाव

राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते. दत्ता मेघे आणि नितीन गडकरी यांची मैत्री अनोखी होती. माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्युपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव टाकलं आहे. खुद्द मेघे यांनी ही माहिती १९ ऑक्टोबर २०२१ रोजी वर्धा येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात दिली होती. सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केलं. नितीनजी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचं नाव दिलं आहे', असे मेघे यांनी तेव्हा सांगितले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande