लातूर - दिशा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप
लातूर, 22 मार्च, (हिं.स.)। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना धनादेश (चेक) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. संजय शिवपूजे, रा
दिशा प्रतिष्ठान


लातूर, 22 मार्च, (हिं.स.)। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना धनादेश (चेक) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. संजय शिवपूजे, राजेश मित्तल, विजय पस्तापुरे, अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने अभिजीत देशमुख, डॉ. अशोक पोद्दार, महेश मालपाणी, इसरार सगरे आणि विष्णुदास धायगुडे यांनी मान्यवरांचा रोप देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा मांडला. डॉ. अशोक पोद्दार व अभिजीत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सहकार्याबरोबरच वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत शस्त्रक्रिया शिबिराबाबत माहिती दिली.

डॉ. संजय शिवपूजे व डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी दिशा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून यशस्वी झाल्यानंतर समाजातील इतर गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात एकूण १६ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. त्यामध्ये रेहान आदम शेख (₹25,000), श्रीरश बालाजी सावरे, लासुने ज्योती किशन, दिया जालिंदर सुरवसे, बिरादार प्राजक्ता तानाजी, सुमित ज्ञानदेव घोडके, पेठकर अंजली लक्ष्मण, शेख शाबाज शकील, काजी रेहान खालेद (प्रत्येकी ₹20,000), ऋतुजा हनुमंत चामे व सदाम जावेद इनामदार (प्रत्येकी ₹15,000), शेख जुबेर सलीम (₹11,000), भूमिका तुकाराम मुंगरे (₹9,200), साहेबा नूर शेख (₹6,366), त्रिशिकेश हिराचंद गिरी व तनवी सोळुंके (प्रत्येकी ₹5,750) यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande