अत्याचार करणाऱ्या खरातची कुठलाही दबाव न आणता निष्पक्ष चौकशी करावी - वनिता मुळाने
नाशिक, 22 मार्च, (हिं.स.)। भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याने अनेक महिलांवर अत्याचार केले व त्यांना ब्लॅकमेल केले अतिशय घुणस्पद कृत्य या अशोक खरात ने केले आहे या विकृत प्रवृत्तीला ठेचण्यासाठी पोलीस प्रशासनावर राजकीय कुठलाही दबाव न आणता त्याची चौ
The-perpetrators-of-the


नाशिक, 22 मार्च, (हिं.स.)। भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याने अनेक महिलांवर अत्याचार केले व त्यांना ब्लॅकमेल केले अतिशय घुणस्पद कृत्य या अशोक खरात ने केले आहे या विकृत प्रवृत्तीला ठेचण्यासाठी पोलीस प्रशासनावर राजकीय कुठलाही दबाव न आणता त्याची चौकशी निष्पक्षपणे करून या विकृत माणसाला त्वरित शिक्षा झाली पाहिजे व अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे असे मत नाशिक जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष वनिता मुळाने यांनी व्यक्त केले.

नाशिक जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने आज अशोक खरात च्या विरोधात अंजनेरी त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले.

त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वनिता मुलाने बोलत होत्या. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांबाबत अनेक गुन्हे घडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाला तसेच एका स्वयंघोषित कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि आता अशोक खरात सारख्या भोंदू बाबा मुळे अनेक महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले. त्यामुळे महिलांबाबत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे असे पण यावेळी वनिता मुलाने यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष वनिता मुलाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी अशोक खरातला शिक्षा द्या महाराष्ट्र सरकार हाय हाय, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

लवकरच या पुण्यातील तपास अधिकारी तेजस्विनी सातपुते यांना भेटून महिला काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वनिता मुलाने यांनी दिली.

याप्रसंगी नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वनिता मुलाने सुनिता चव्हाण मंगला शिंदे शाहीन शेख माया चव्हाण अनिता काळे संजना भालके सविता चव्हाण , मंगला रुपवते, नीलिमा पाटील, साजिया शेख, संतोष शिंदे अशोक चव्हाण नारायण भगत लाला घुले आदी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande