पातूर - आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने प्राण वाचले
अकोला, 24 मार्च (हिं.स.)। पातूर पंचायत समिती अंतर्गत पिंपळखुटा येथील घरकुल लाभार्थी युसुफ शहा यांनी सीईओ कार्यालयात २४ मार्च रोजी १२ वाजताच्या सुमारास पेट्रोलने आत्मदान करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठा अनर्थ ट
Photo


अकोला, 24 मार्च (हिं.स.)। पातूर पंचायत समिती अंतर्गत पिंपळखुटा येथील घरकुल लाभार्थी युसुफ शहा यांनी सीईओ कार्यालयात २४ मार्च रोजी १२ वाजताच्या सुमारास पेट्रोलने आत्मदान करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला, पोलिसांनी युसुफ शाह याला तब्येत घेऊन समजूत काढली, पिंपळखुटा ग्राम पंचायतचे सरपंच, सचिव यांनी आर्थिक व्यवहार करून अतिक्रमण मध्ये घरकुल मंजूर केले व त्यांचे पूर्ण देयक काढले, युसुफ शाह यांना तिसरा हप्ता काढण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली, असा आरोप युसूफ शाह यांनी केला आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने अतिक्रमणचे कारण पुढे करून तिसरा हप्ता रोखण्यात आला, याबाबत युसुफ शहा यांनी संबंधिताकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझ्या एकट्या कुटुंबाला वेठीस धरल्या जात आहे. माझे घराचे बांधकाम अतिक्रमण मध्ये असेल तर मला पहिला व दुसरा हप्ता का देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत न्याय मिळत नसल्याने युसुफ शाह यांनी सीईओ कार्यालयात १६ मार्च रोजी ठिय्या आंदोलन केले होते. तरीही न्याय मिळत नसल्याने त्यांनी २४ मार्च रोजी सीईओ कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande