दुर्गवाड्यात रस्त्याच्या प्रश्नावर आमरण उपोषण; शिवसेना शिंदे गट आक्रमक
अकोला, 24 मार्च (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा येथे रस्त्याच्या प्रश्नावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून, पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. दुर्गवाडा गावातील जिल्हा परिषद सर्कल प्रमुख रोहन नवघरे
Photo


अकोला, 24 मार्च (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा येथे रस्त्याच्या प्रश्नावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून, पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

दुर्गवाडा गावातील जिल्हा परिषद सर्कल प्रमुख रोहन नवघरे यांनी भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले आहे. गावातील मुख्य रस्ता, म्हणजेच ग्रामीण मार्ग क्रमांक 76 वरील अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

यासोबतच, दुर्गवाडा येथे जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामात अनियमितता होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रस्त्याची रुंदी व लांबी यांचे अचूक मोजमाप करून, मध्यभागापासून दोन्ही बाजूंनी काम सुरू करावे, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

या विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणामुळे स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे. आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन काय निर्णय घेते आणि या प्रश्नावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande