डॉ. वळसंगकरांची सुसाईड नोट प्लांट केली असू शकते, वकिलांचा संशय
सोलापूर, 24 मार्च (हिं.स.)। प्रसिध्द न्यरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली सुसाईड नोट प्लांट केलेली असू शकते असा आरोप संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी केला. सुसाईड नोटबाबत सर्वांच्या जबाबातील विस
डॉ. वळसंगकरांची सुसाईड नोट प्लांट केली असू शकते, वकिलांचा संशय


सोलापूर, 24 मार्च (हिं.स.)। प्रसिध्द न्यरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली सुसाईड नोट प्लांट केलेली असू शकते असा आरोप संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी केला. सुसाईड नोटबाबत सर्वांच्या जबाबातील विसंगतीवर त्यांनी बोट ठेवत हा आरोप केल्याने या खटल्याला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिने न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर युक्तिवादास सुरुवात झाली. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षाच्या वकिलांनी सोमवारी युक्तिवाद केला. मनीषाचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी 17 व 18 एप्रिल 2025 या दोन दिवसांच्या घटना न्यायालयासमारे मांडल्या. 17 रोजी मनीषाने मेल पाठवला होता. त्यानंतर लगेच माफीनामाही दिला. त्यामुळे केवळ दोन दिवसात तिच्यामुळे डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली, असे म्हणता येणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande