पुणे - गॅस वितरणात अनिश्चितता; ग्राहक हवालदिल
पुणे, 24 मार्च, (हिं.स.) - आखाती देशांतील वाढत्या तणावाचा आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक इंधन पुरवठा साखळीवर झाला आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा काही ठिकाणी विस्कळित झाला असून, वितरणात मोठी अनिश्चितता निर्माण झा
gas


पुणे, 24 मार्च, (हिं.स.) - आखाती देशांतील वाढत्या तणावाचा आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक इंधन पुरवठा साखळीवर झाला आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा काही ठिकाणी विस्कळित झाला असून, वितरणात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी साठा उपलब्ध असला तरी, अनेक भागांत ग्राहकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.एकूणच या संघर्षाने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापासून ते हॉटेल व्यवसायापर्यंत सर्वांचेच गणित बिघडवले आहे.

दरम्यान, पाच दिवस हल्ले थांबविण्याची सोमवारी घोषणा झाली; यामुळे सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होणार का, याकडे लक्ष लागले आहे.पौड - केंद्र व राज्य सरकार इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे सांगत असले, तरी मुळशीतील भूगाव, पिरंगुट आणि पौड परिसरात चित्र वेगळे आहे. घरगुती सिलिंडरसाठी महिलांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. पाच किलोच्या छोट्या सिलिंडरचे दरही १०० रुपये किलोवरून ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे ग्रामीण भागात गॅस लायटरची जागा पुन्हा फुकणीने घेतली असून महिलांना लाकडासाठी पायपीट करावी लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande