समाजाच्या विकासासाठी भवनाची गरज; तटकरे यांना निवेदन सादर
रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। श्रीवर्धन तालुक्यातील नंदीवाली काशी कपडे समाजाच्या वतीने अध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान समाजाच्या विविध समस्या, गरजा आणि
Need for building for development of society; Submission to Tatkare


रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। श्रीवर्धन तालुक्यातील नंदीवाली काशी कपडे समाजाच्या वतीने अध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान समाजाच्या विविध समस्या, गरजा आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी समाजासाठी स्वतंत्र समाज भवन उभारण्याची अत्यंत गरज असल्याचे अधोरेखित केले. सध्या समाजाच्या सभा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांसाठी योग्य जागेचा अभाव जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शासनाने समाजासाठी जागा उपलब्ध करून देत निधी मंजूर करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. समाज भवन उभारल्यास समाजातील ऐक्य वृद्धिंगत होण्यास मदत होईल तसेच युवकांना विविध उपक्रमांसाठी व्यासपीठ मिळेल, असेही प्रतिनिधींनी सांगितले.

यावर आमदार अदिती तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीत समाजातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने समाज भवन उभारणीसाठी पाठिंबा दर्शवला. एकूणच, या सदिच्छा भेटीतून समाजाच्या प्रश्नांना शासन स्तरावर मांडणी मिळाली असून समाज भवनाच्या मागणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande