पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर
पुणे, 24 मार्च, (हिं.स.)। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज सर्वसाधारण सभेत महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १५ हजार ६६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच महापालिकेचा
PMC news


पुणे, 24 मार्च, (हिं.स.)। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज सर्वसाधारण सभेत महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १५ हजार ६६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच महापालिकेचा अर्थसंकल्प १५ हजार कोटींच्या टप्प्यावर पोहोचला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांच्या मूळ प्रस्तावित १३,९९५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांनी १,६७४ कोटी रुपयांची भर घालून हा वाढीव आराखडा तयार केला. या अर्थसंकल्पात विकासकामांसोबतच महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तर महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींवर ५० टक्के कर सवलत देण्यात येणार आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी १०० नवीन स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande