रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे २७ मार्चपासून आध्यात्मिक कार्यक्रम
रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने रत्नागिरीत वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात प्रवचने, अनुभवकथन आणि कीर्तन अशा तीन आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येत्या २७ ते २९ मार्च दरम्यान सायंकाळी ५.४५ ते ७.३०
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे २७ मार्चपासून आध्यात्मिक कार्यक्रम


रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने रत्नागिरीत वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात प्रवचने, अनुभवकथन आणि कीर्तन अशा तीन आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येत्या २७ ते २९ मार्च दरम्यान सायंकाळी ५.४५ ते ७.३० या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत.

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि सारस्वत स्नेहवर्धक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २७ रोजी अध्यात्म मंदिरात “नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” या विषयावर मिलिंद तेंडुलकर यांची मुलाखत प्रा. विस्मया कुलकर्णी घेणार आहेत. २८ मार्च रोजी संत दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले या विषयावर अस्मिता अरुण देशपांडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. २९ मार्च रोजी रत्नागिरी कीर्तनकार मंडळाच्या विद्यमाने एकादशी कीर्तनसेवा उपक्रमांतर्गत हभप मयूरी जोशी यांचे कीर्तन होणार आहे.

या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमास रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande