महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणुकीसाठी मतदान शांततेत; अमरावतीत सुमारे ५० टक्के मतदान
अमरावती, २५ मार्च (हिं.स.) :महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीसाठी मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी राज्यभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. विधी क्षेत्राचे प्रतिनिधित्व ठरवणारी ही निवडणूक असल्याने वकिलांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. महार
महाराष्ट्र–गोवा बार कौन्सील निवडणूक : 153 उमेदवार रिंगणात; अमरावतीत सुमारे 50 टक्के मतदान


अमरावती, २५ मार्च (हिं.स.) :महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीसाठी मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी राज्यभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. विधी क्षेत्राचे प्रतिनिधित्व ठरवणारी ही निवडणूक असल्याने वकिलांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.

महाराष्ट्र व गोवा मिळून सुमारे दीड लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत पात्र होते. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातून ९ हजार ३५९ तर अमरावती जिल्ह्यातून सुमारे २ हजार ५०० मतदार मतदानासाठी पात्र असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयातील अभिलेखागार कक्ष क्र. १२६ तसेच पोलिंग बूथ क्र. ५५ येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडले. येथे एकूण १ हजार २०२ वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे अमरावतीत सुमारे ५० टक्के मतदान झाल्याची चर्चा न्यायमंदिर परिसरात होती.

या निवडणुकीत नागपूर येथील ऍड. पारिजात पांडे, ऍड. आसिफ शौकत कुरेशी आणि ऍड. अनिल महादेवराव गोवारदीपे यांसारखे अनुभवी उमेदवार रिंगणात होते. तर ऍड. सागर लांबट, ऍड. संजय मोरे, ऍड. संदीप नंदेश्वर, ऍड. वैशाली खेडेकर, ऍड. प्रियांका चोखरे आणि ऍड. उमा भट्टड यांनी प्रथमच निवडणूक लढवली.

राज्यभरातून एकूण १८ पुरुष आणि ५ महिला सदस्यांची निवड करण्यात येणार असून, याशिवाय दोन महिला सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रिसायडिंग ऑफिसर दीनदयाल भिसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande