परभणी - मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज
परभणी, 25 मार्च, (हिं.स.)। भारतीय लोकशाही प्रक्रियेचा कणा मानल्या जाणाऱ्या मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या वतीने “मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम” हाती घेण्यात आला आहे. लवकरच म्हण
परभणी - मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज


परभणी, 25 मार्च, (हिं.स.)। भारतीय लोकशाही प्रक्रियेचा कणा मानल्या जाणाऱ्या मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या वतीने “मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम” हाती घेण्यात आला आहे. लवकरच म्हणजेच माहे एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रापत देखील हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून परभणी जिल्हयातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे व मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ नोंदणीपुरता मर्यादित नसून, स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे मतदार यादीचे शुद्धीकरण आहे. या कार्यक्रमातंर्गत दुबार नावे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नोंद वगळून तसेच अपूर्ण किंवा अस्पष्ट छायाचित्रे दुरुस्त करून पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत. एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र नाव यादीत राहू नये,” हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये. स्वतः पुढाकार घेऊन मतदार यादीत आपले नाव तपासावे व आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande