
अकोला, २५ मार्च (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांची एक महत्त्वपूर्ण बैठक अकोला महानगर कार्यालयात जिल्हा निरीक्षक गणेश राय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीची सुरुवात महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी यांनी गणेश राय यांचा सत्कार करून केली.
या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष शामबाबू अवस्थी, प्रदेश संघटन सचिव जावेद जकारिया, नगरसेवक पंकज गावंडे, सय्यद वसीम, कार्याध्यक्ष युसूफ अली, देवाभाऊ ताले, पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण, मोहम्मद शफीक उर्फ पप्पू भाई, चंदूभाई चांदखान, सतीश सरपते, वसीम सिद्दीकी, महिला अध्यक्ष सरला ताई, अलीम ठेकेदार, जावेद खान, अमन घरडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक प्रभागात जबाबदार कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे तसेच नागरिकांच्या समस्या महानगरपालिकेमार्फत प्रभावीपणे सोडविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी नुकतेच निवडून आलेले नगरसेवक रफीक सिद्दीकी, पंकज गावंडे आणि सय्यद वसीम यांचा जिल्हा निरीक्षक गणेश राय यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे