छ. संभाजीनगर - घाटनांद्रा येथे अखंड हरिनाम सप्ताह
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.) । घाटनांद्रा येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व हनुमान चरित्रकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कथा प्रवक्ते ज्ञानेश्वर महाराज शेवगावकर हे हनुमान चरि
छ. संभाजीनगर - घाटनांद्रा येथे अखंड हरिनाम सप्ताह


छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.) । घाटनांद्रा येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व हनुमान चरित्रकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कथा प्रवक्ते ज्ञानेश्वर महाराज शेवगावकर हे हनुमान चरित्राचे निरूपण करणार आहेत.

येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात १९ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंडपणे सुरू असून, याहीवर्षी गुरुवार (ता. २६) पासून सप्ताहास प्रारंभ होत आहे. दोन एप्रिलला रामेश्वर महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाने वमहाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, दररोज पहाटे पाच ते सकाळी सात काकडा भजन, सकाळी ११ ते सायंकाळी पाच हनुमान चरित्र कथा, सायंकाळी नित्यनेम हरिपाठ तसेच रात्री नऊ ते ११ नामांकित महाराजांची हरिकीर्तने होणार आहेत. सात दिवस चालणाऱ्या या भक्तिमय अखंड हरिनाम सप्ताह व हनुमान चरित्र कथा सोहळ्याचा परिसरातील ग्रामस्थ, भाविक व महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता. २६) भानुदास महाराज जिरीकर, शुक्रवारी (ता. २७) आयोध्याताई सुलताने, शनिवारी (ता. २८) मंदार महाराज नाशिककर, रविवारी (ता. २९) आजिनाथ महाराज बलांडे, सोमवारी (ता. ३०) गोरक्षनाथ महाराज काकडे, मंगळवारी (ता. ३१) अनिल महाराज गुंड, तर बुधवारी (ता. एक) रामेश्वर महाराज कुबेरधाम यांचे कीर्तन होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande