
बीड, 25 मार्च (हिं.स.)।
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील चैतन्य कानिफनाथ महाराज यांचे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर असुन या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील कुलकर्णी परिवाराच्या वतीने चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या पादुका घोड्यावर ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. रात्री १० वाजता गेवराई ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवार यांच्या हस्ते मंदिरात विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाचेगाव येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेश खरसाडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, बाळराजे पवार, देवगिरी प्रांत हिंदू जागृती समितीचे संयोजक अंबादास अंबोरे, मंडल अधिकारी प्रियंका घोडके, पं. स.चे माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, सरपंच नंदकुमार गाडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी कानिफनाथ मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis