परभणी - भर उन्हात सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ; मानवतमध्ये गॅस टंचाई तीव्र
परभणी, 25 मार्च, (हिं.स.)। घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मानवत शहरात गॅस पुरवठा मानवत गॅस एजन्सीमा
अ


परभणी, 25 मार्च, (हिं.स.)। घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मानवत शहरात गॅस पुरवठा मानवत गॅस एजन्सीमार्फत केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

बुकिंगनंतर एजन्सीतून पावती देण्यात येते आणि त्या पावतीवर ग्राहकांना गोडाऊनवर जाऊन सिलेंडर घ्यावा लागतो. मंगळवार, ता. २४ रोजी अनेक ग्राहक गोडाऊनसमोर लांबच लांब रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या रांगेत महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

दरम्यान, परीक्षा सुरू असतानाही विद्यार्थ्यांना अभ्यास बाजूला ठेवून सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भर उन्हात तासन्तास थांबूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande