नांदेड शहराला 'क्षयरोगमुक्त' करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा - महापौर
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। नांदेड शहराला पूर्णपणे टीबीमुक्त (क्षयरोगमुक्त) करण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर कविता मुळे यांनी केले. शहरातील नागरिकांमध्ये
नांदेड शहराला 'क्षयरोगमुक्त' करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा - महापौर


नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। नांदेड शहराला पूर्णपणे टीबीमुक्त (क्षयरोगमुक्त) करण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर कविता मुळे यांनी केले. शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. महापौर कविता मुळे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले पुतळा येथे हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. महापालिकेच्या जंगमवाडी येथील रुग्णालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर, एमपीडब्ल्यू, एएनएम, जीएनएम, आशा वर्कर तसेच जी.डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमी व स्वामी विवेकानंद नर्सिंग स्कूल नांदेडचे शिक्षक व सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, सहभागी झाले होते.

डॉ. मृत्युंजय महिंद्रकर, डॉ. भरत तोष्णीवाल, डॉ. समीर कोटलवार यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह देभन सत्कार करण्यात आला. तसेच नांदेड शहरामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या उत्कृष्ट आशा ताई, एनटीईपी विभागात उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी विवेकानंद हाळीकर, रवींद्रकुमार कावडे व कृष्णा भुसेवाड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना क्षयरोग मुक्तीची शपथ देण्यात आली.

---------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande