आसाम : आयुष्मान भारत योजनेत 64 लाखांची हेराफेरी
गुवाहाटी, 25 मार्च (हिं.स.) : आसामच्या गुवाहाटी येथील रुग्णालयाने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत 778 बोगस दावे सादर करून 64 लाख 10 हजार 780 रुपये लाटल्याचा प्रकार अंमलबजावणी संचनालयाच्या (ईडी) तपासात पुढे आला आहे. आरोपींनी लाभार्थींना फसवण्
ईडी लोगो


गुवाहाटी, 25 मार्च (हिं.स.) : आसामच्या गुवाहाटी येथील रुग्णालयाने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत 778 बोगस दावे सादर करून 64 लाख 10 हजार 780 रुपये लाटल्याचा प्रकार अंमलबजावणी संचनालयाच्या (ईडी) तपासात पुढे आला आहे.

आरोपींनी लाभार्थींना फसवण्यासाठी त्यांना 300 रुपये देऊन खोटे रुग्ण बनवले आणि त्यांच्या फोटो काढले. हे फोटो नंतर संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करून रुग्णालयाने उपचार केले असल्याचे दर्शविले. ईडीने धनशोधन प्रतिबंध कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत असमच्या ह्यालाकांडी येथील शिफा रुग्णालय व संशोधन केंद्राचे मालक मोबजिल हुसैन बरभुइया यांची सुमारे 55.33 लाख रुपये मूल्याची अचल संपत्ती तात्पुरती जप्त केली आहे. तपासात असे आढळले की 22 एप्रिल 2019 ते 5 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शिफा रुग्णालयाने कोणतेही वैध वैद्यकीय उपचार न देता 778 खोटे दावे केले. ज्या ठिकाणी रुग्णालय असल्याचे जाहीर केले होते, तेथे रुग्णालय अस्तित्वात नाही.

आरोपींनी फसवणूक करण्यासाठी अशी योजना राबवली की आयुष्मान कार्डधारक लाभार्थींना अस्थायी रुग्णालयात बोलवले, त्यांना 300 रुपये देऊन खाटेवर झोपवून फोटो काढले आणि ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलवर अपलोड केले. या खोट्या दाव्यांवरून राज्यातील अटल अमृत अभियान सोसायटीने 57.96 लाख रुपये शिफा रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केले. तपासात असेही आढळले की आरोपींनी या निधीचा उपयोग करून 5 भूखंड आणि 2 इमारतींची निर्मीती केली. ईडीने या 6 अचल संपत्त्या तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत, ज्यांचे एकूण मूल्य सुमारे 55.33 लाख रुपये आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande