
मुंबई, २५ मार्च (हिं.स.) - २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज २५ मार्च रोजी सूप वाजले. आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत होणार आहे.
या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या एकूण २० बैठका झाल्या. विधानसभेचे कामकाज एकूण १९७.२७ मिनिटे कामकाज चालले. अन्य कारणांमुळे १५ मिनिटे वेळ वाया गेला, तर मंत्री उपस्थित नसल्यामुळे १ घंटा वेळ वाया गेला. नियमितचे कामकाज सरासरी ९.५० मिनिटे इतके झाले. एकूण ९ हजार ३६० प्रश्न प्राप्त झाले. त्यांतील ५७१ प्रश्न स्वीकृत झाले. यांतील १०५ प्रश्नांना उत्तर देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी