मराठवाडा विभागातील अतिक्रमण एप्रिलपासून हटाव मोहिम
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)मराठवाडा विभागातीलसार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, नाले व शासकीय जागांवरील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांन
मराठवाडा विभागातील अतिक्रमण एप्रिलपासून हटाव मोहिम


छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)मराठवाडा विभागातीलसार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, नाले व शासकीय जागांवरील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांची बैठक घेऊन नगरपालिका प्रशासनातील प्रलंबित मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील जिल्हाधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत अनेक नगरपालिकांमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याचे निदर्शनास आले. थकबाकी कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवून महसूल वाढविण्यावर भर द्या, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत मंजूर व प्रलंबित घरकुलांची माहिती तपासून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला. जिओ-टॅगिंग व एमआयएस प्रणाली अद्ययावत ठेवून पारदर्शकता वाढविणे आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा प्रभावी लाभ पोहोचविणे आवश्यक आहे. 'सर्वांसाठी घर' हे उद्दिष्ट निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

------------------

'

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande