पूर्णा रेल्वेस्थानकाच्या संरक्षण भिंतीलगतची अतिक्रमणे हटविली
परभणी, 25 मार्च (हिं.स.)। पूर्णा येथील रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर होणारी अतिक्रमणे पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात हटविण्यास सुरुवात केली. येथील रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत मुख्य रस्त्याच
पूर्णा रेल्वेस्थानकाच्या संरक्षण भिंतीलगतची अतिक्रमणे हटविली


परभणी, 25 मार्च (हिं.स.)।

पूर्णा येथील रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर होणारी अतिक्रमणे पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात हटविण्यास सुरुवात केली.

येथील रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत मुख्य रस्त्याच्या कडेला नाल्यावर मोठ्या प्रमाणावर छोटी-मोठी अतिक्रमणे पध्दतशीरपणे विसावली होती. पानटपरी, छोट्या हॉटेल्ससह अन्य स्टॉल्स सुध्दा बिनधास्तपणे उभारल्या गेले होते. या अतिक्रमणाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर ओरड होऊनसुध्दा पालिका प्रशासनाने नाल्यावरील ती अतिक्रमणे काही हटविलीच नाहीत. अखेर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कृष्ट गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी-कर्मचार्यांच्या एका पथकाने या नालीवरील सर्व अतिक्रमणे जेसीबी मशीन आणून हटविण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी या अतिक्रमणकर्त्यांनी सर्व अतिक्रमणे स्वतःहून हटवावी, असे सूचविण्यात आले होते. त्याप्रमाणे काहींनी अतिक्रमणे काढली. परंतु, अन्य काही विक्रेत्यांनी ही अतिक्रमणे हटविली नाहीत. या दरम्यान या पथकाने जेसीबी मशीनद्वारे सर्व साहित्य उचलून ते ट्रॅक्टरद्वारे नेऊन जप्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande