नांदेड येथे मेंदू विकारग्रस्तांसाठी २७मार्चपासून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। मेंदू विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर २७ मार्चपासून शहरात आयोजित केले आहे. राजस्थान एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व विविध नामांकित वैद्यकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. या उपक्रम
नांदेड येथे मेंदू विकारग्रस्तांसाठी २७मार्चपासून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। मेंदू विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर २७ मार्चपासून शहरात आयोजित केले आहे. राजस्थान एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व विविध नामांकित वैद्यकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तज्ज्ञ उपचारांची संधी उपलब्ध होणार आहे.

हे शिबिर शहरातील आर.आर. मालपाणी मोतीरामजी विद्यालय येथे आयोजित करण्यात आले असून २७ व २८ मार्च या कालावधीत सकाळपासून तपासणी व उपचार सुरू राहणार आहेत. शिबिरात मेंदू विकार, न्यूरोलॉजिकल आजार, तसेच संबंधित गुंतागुंतीचे निदान व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहेत. गत १६ वर्षांपासून निरंतर सुरु असलेल्या ३१ शिबिरांमधून हजारो रुग्णांना लाभ मिळाला असून अनेकांना शस्त्रक्रियेसाठी मदत मिळत आहे.

दोन दिवस चालणाऱ्या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहे. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुक रुग्णांनी आर.आर. मालपाणी विद्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. मोठ्या संख्येने रुग्ण येण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोजकांनी निवास व भोजनाची व्यवस्था देखील केली आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा येथील रुग्णांनाही फायदा होणार आहे. मेंदू विकारग्रस्त रुग्णांसाठी हे शिबिर वरदान ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande