बीड जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय!
बीड, 25 मार्च (हिं.स.)। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईच्या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात बाटली किं
बीड जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय!


बीड, 25 मार्च (हिं.स.)।

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईच्या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल आणि डिझेल देण्यास कडक बंदी घातली आहे. हा निर्णय अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला. अनेक ग्राहक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून इंधनाचा साठा करत असल्याने सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे की, कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना बाटली अथवा कॅनमध्ये सुट्या स्वरूपात इंधन देऊ नये. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पंप चालकांवर शासन नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात सर्व तहसीलदारांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande