
नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.)। गुजरातमध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधेयकाला पाठींबा देणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन केले.
अमित शाह एक्स वरील संदेशात म्हणाले, “देशातील प्रत्येक नागरिकासाठी एकसमान कायदा असावा हा आमच्या पक्षाचा स्थापनेपासूनच संकल्प आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाची राज्य सरकारे या दिशेने सातत्याने पुढे वाटचाल करत आहेत. उत्तराखंडनंतर गुजरातनेही समान नागरी संहिता विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक कार्य करून आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन करतो. देशाचे शासन तुष्टीकरणावर नव्हे तर सर्व नागरिकांसाठी समान कायद्यांवर चालावे याला आमचे प्राधान्यही आहे आणि कटीबद्धताही आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule