गॅस पुरवठा सुरळीत करावा : मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीची मागणी
परभणी, 25 मार्च (हिं.स.)। शहरात घरगुती गॅस सिलेंडर ची मोठ्याप्रमाणावर टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समिती ने केली आहे. यासंदर्भात तहसीलदार,
गॅस पुरवठा सुरळीत करावा : मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीची मागणी


परभणी, 25 मार्च (हिं.स.)।

शहरात घरगुती गॅस सिलेंडर ची मोठ्याप्रमाणावर टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समिती ने केली आहे.

यासंदर्भात तहसीलदार, मानवत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानवत शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत असून या समस्येकडे आपल्या कार्यालयाने तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

मानवत गॅस एजन्सीमार्फत शहराला गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग करूनही ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नाही. त्यानंतर पावती घेऊन गोडाऊनवर जावे लागत असून, तेथेही ग्राहकांना भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. उन्हात उभे राहूनही गॅस सिलेंडर मिळत नाही. या रांगेत महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश होता. सध्या परीक्षेचे दिवस सुरू असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवत शहरातील गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. अतिरिक्त गॅस सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा.

गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांची गैरसोय टाळावी.

निवेदनावर मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार तोष्णीवाल, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक, मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीचे सचिव शाम झाडगावकर, उपाध्यक्ष, गोपाळ लाड, कार्याध्यक्ष प्रसाद जोशी, सहसचिव बालाजी पोकळे, सहकोषाध्यक्ष प्रकाश करपे, प्रफुल्ल जैन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande