
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर शाखेची इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर असून लवकरच तिचा लोकार्पण सोहळा एप्रिल महिन्यात पार पडणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोकराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
ही नवीन इमारत अद्यावत फर्निचरसह सुसज्ज अशी उभारण्यात आलेली असून येणाऱ्या ग्राहकांना बसण्यासाठी वेटींग हॉलसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध राहणार आहेत. ही इमारत केवळ भोकर तालुक्यातच नव्हे तर संबंध जिल्ह्यात सुसज्ज अशी तयार करण्यात आली आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असल्यामुळे सदरचा लोकार्पण सोहळा हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आलेला आहे. कार्यकमाचा दिनांक निश्चित झाल्यानंतर यथावकाश सर्व संबंधितांना कळविण्यात येईल. या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष भास्कराव पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis