धर्माबाद रेल्वेस्थानक नांदेड विभागात समाविष्ट करा; अन्यथा तीव्र आंदोलन
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। समराळा रेल्वेस्थानक नांदेड विभागात आणि धर्माबाद मात्र हैदराबाद विभागात ठेवण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावामुळे धर्माबाद शहरात संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात धर्माबाद नगरपरिषदेच्या वतीने रेल्वे प्रशासनाबद
धर्माबाद रेल्वेस्थानक नांदेड विभागात समाविष्ट करा; अन्यथा तीव्र आंदोलन


नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। समराळा रेल्वेस्थानक नांदेड विभागात आणि धर्माबाद मात्र हैदराबाद विभागात ठेवण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावामुळे धर्माबाद शहरात संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात धर्माबाद नगरपरिषदेच्या वतीने रेल्वे प्रशासनाबद्दल आक्रमक पवित्रा घेण्यात आला.

उपनगराध्यक्ष शंकर बोलमवाड म्हणाले, हैदराबाद विभागाचे अधिकारी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेत आहेत. धर्माबाद रेल्वेस्थानकातून मिळणारा महसूल हैदराबादकडे वळवण्यासाठीच हा जाणीवपूर्वक रचलेला डाव आहे. नागरिकांच्या सोयीपेक्षा प्रशासनाला केवळ महसूल महत्त्वाचा वाटत आहे. गटनेते ताहेर पठाण म्हणाले, धर्माबाद हे सीमावर्ती भाग असल्याने येथील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. महसूल महत्त्वाचा मानून जर रेल्वे प्रशासन काम करणार असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही.

रेल्वे विभागाने मागण्या लक्षात घ्याव्यात....

धर्माबाद रेल्वेस्थानक नांदेड विभागात आल्यास प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल. स्थानिकप्रवाशांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आणि रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी नांदेड विभाग सोयीचा ठरेल. जर समराळा रेल्वेस्थानक नांदेड विभागात जाऊ शकते तर मग धर्माबादलाच हैदराबाद विभागात का अडकवून ठेवले जात आहे हेच तर कळत नाही.तर आंदोलन केले जाईलधर्माबादच्या जनतेच्या भावनांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने आपला निर्णय बदलावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande