चार इलेक्ट्रीकल गाडयांचे लोकार्पण; विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सुविधा
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी कॅम्पसमध्ये मोफत इलेक्ट्रीक वाहनांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थी, संशोधकांसाठीच्या या गाडयाचे लोकार्पण क
Q


छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी कॅम्पसमध्ये मोफत इलेक्ट्रीक वाहनांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थी, संशोधकांसाठीच्या या गाडयाचे लोकार्पण कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते व व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पीएम उषा प्रकल्पातंर्गत १०० कोटींच्या निधी विद्यापीठास मिळणार आहे. यातून पायाभूत सुविधा व तांत्रिक उपकरणांची खरेदी करण्यात येत आहे. या अंतर्गत सुमारे ४० लाखांच्या खर्च करुन चार इलेक्ट्रीक गाडया घेण्यात आल्या आहेत. यामध्ये १४ आसन क्षमतेच्या दोन तर आठ आसनच्या दोन गाडयांचा समावेश आहे. या गाडयांचे लोकार्पण मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य इमारतीसमोर हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रकुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, काशिनाथ देवधर, डॉ.अंकुश कदम, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.गौतम पाटील, डॉ.रविकिरण सावंत, डॉ.योगिता पाटील, डॉ.अर्पणा पाटील, डॉ.व्यंकट लांब, अॅड.दत्तात्रय भांगे, नितीन जाधव, डॉ संजय साळुंके, डॉ वैशाली खापर्डे, संचालक डॉ बी एन डोळे, डॉ कैलास अंभुरे, संचालक डॉ.गुलाब खेडकर, वाहनतळ प्रमुख डॉ.विनय लोमटे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. या गाडयांचे वाहक सचिन पंडुरे, किशोर जाधव, परमेश्वर मोहिते व संजय लोखंडे यांनी सारथ्य केले. या गाडया मुख्य गेट ते विद्यापीठातील सर्व विभागांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थी, संशोधक विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे, मात्र यासाठी विद्यार्थ्यांना सोबत ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. इलेक्ट्रिकल गाडया उपलब्ध झाल्यामुळे उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गैरसोय दूर होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande