
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। महात्मा जोतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. संस्थापक अध्यक्ष विशाल पुंड यांनी एका बैठकीत जाहीर केली. बाबूलाल मगर यांची अध्यक्षपदी, तर प्रवीण गाडेकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनात जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
उर्वरित कार्यकारिणीमध्ये अशोक दामले (स्वागताध्यक्ष), ताराचंद गायकवाड (सरचिटणीस), आसाराम वीरकर (कोषाध्यक्ष) आणि विलास ढंगारे (प्रसिद्धिप्रमुख) यांचा समावेश आहे. या बैठकीला रामभाऊ पेरकर, जयवंत गायकवाड, बाबासाहेब पुंड, नितीन खरात, शारदा कोथिंबिरे, रोहिणी काळे, मंजूषा महाजन, अंजली पुंड, विजय वाघमारे, दत्ता तारो, विजय काळे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis