नांदेड येथे गुरुवारी 'राम पहाट' सुरमयी संगीत सोहळ्याचे आयोजन
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। श्रीराम नवमीचे औचित्य साधून गुरुवारी नांदेड येथे ''राम पहाट'' सुरमयी संगीत सोहळ्याचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी रामगीते रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार
नांदेड येथे गुरुवारी 'राम पहाट' सुरमयी संगीत सोहळ्याचे आयोजन


नांदेड, 25 मार्च (हिं.स.)। श्रीराम नवमीचे औचित्य साधून गुरुवारी नांदेड येथे 'राम पहाट' सुरमयी संगीत सोहळ्याचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी रामगीते रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. या उपक्रमाचे चौथे वर्ष असून, कलागण प्रतिष्ठान, श्रीराम भक्त मंडळाच्या विद्यमाने सोहळा साकार होत आहे.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता आयोजित 'राम पहाट' संगीतपर्वाचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार असून, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, डॉ. नितीन जोशी, डॉ. सुशील राठी, मनोजगुरू पेठवडजकर, उद्योजक रमेश पारसेवार, भगीरथ राठी आदींची उपस्थिती असणार आहे.

या सोहळ्यात प्रशांत काळुंद्रेकर (मुंबई), प्रज्ञा देशपांडे (पुणे), संज्योती जगदाळे (मुंबई) हे रामगीते सादर करणार आहेत. त्यांना मंदार गोडसे, विवेक परांजपे, यश सोमण, पंढरीनाथ दरेकर, पंकज शिरभाते, भगवान देशमुख विविध वाद्यावर साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निरूपण अॅड. गजानन पिंपरखेडे हे करणार आहेत. या कार्यक्रमात प्रभू श्रीरामाचा १७ कोटी नामजप पूर्ण करणारे व्यंकटेश पाटणूरकर व अमरनाथधाम येथील आतापर्यंत २७ यात्रा सफल करणारे दिलीप ठाकूर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.२६ मार्च रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात 'राम पहाट''राम पहाट' सोहळ्यात नांदेडकरांनी सहभागी होऊन रामगीतांचा लाभघ्यावा, असे आवाहन केले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande