रामराज्य ग्रुपच्या वतीने प्रभू श्रीराम जन्मोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। रामराज्य ग्रुपच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त गुरुवारी (दि.२६) ''प्रभू श्रीराम जन्मोत्सव'' साजरा केला जाणार आहे. उल्कानगरी येथील श्रीराम मंदिरात सायंकाळी ६ वाजता उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दिवसभर शहरातील
रामराज्य ग्रुपच्या वतीने प्रभू श्रीराम जन्मोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)। रामराज्य ग्रुपच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त गुरुवारी (दि.२६) 'प्रभू श्रीराम जन्मोत्सव' साजरा केला जाणार आहे. उल्कानगरी येथील श्रीराम मंदिरात सायंकाळी ६ वाजता उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दिवसभर शहरातील लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वरोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, सीता-राम पथनाट्य, प्रतिमा पूजन, महाआरती, महाप्रसाद अशा विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा आयोजक पै.रामा मुळे, जिल्हाध्यक्ष सचिन राठोड, महिला जिल्हा अध्यक्षा मीरा पाटील यांनी दिली.

रामराज्य ग्रुपचे रामा मुळे म्हणाले, हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी २०११ पासून रामराज्य ग्रुप विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत आहे. ग्रुपच्या वतीने शहर व ग्रामीण भागात दर शनिवारी विविध

मंदिरात हनुमान चालीसा पठण केल्या जाते. लहान मुलांवर अध्यात्मिक संस्कार रुजावे आणि हिंदू संस्कृती जोपासली जावी या हेतूने या उपक्रमाचे सातत्याने आयोजन केल्या जाते. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी ही मोठी गंभीर बाब असल्याने सामाजिक विचारांना संकटात टाकणारी आहे. म्हणून गेल्या सात वर्षापासून आम्ही प्रभू श्रीरामांचे विचार प्रत्येकामधे रुजविण्यासाठी भव्य दिव्य असा श्रीराम जन्मोत्सव साजरा करणार आहोत. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रामराज्य ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड, सचिव आदिनाथ मुळे, कोषाध्यक्षा माऊली तोडमल, जिल्हा संघटक अनिल लहाने, आर्चित जाधव, अविनाश दौंड पाटील, शहराध्यक्ष अजय राठोड, वैजापूर तालुकाध्यक्ष रवी आवारे, अण्णा दांडेकर, गंगापूर तालुकाध्यक्ष शुभम नेव्हाल, कन्नड तालुकाध्यक्ष शैलेश नीळ, वाळूज शहराध्यक्ष अमोल धनवटे, मध्य शहराध्यक्ष शुभम दहिवाल, उपजिल्हाध्यक्ष दिपाली पाटील, शुभम डमाले हे पुढाकार घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande