छ.संभाजीनगर : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)।श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ज्योतिनगर येथील श्री महावीर हनुमान मंदिर व श्री विठ्ठल मंदिर परिसरात संगीतबद्ध सामूहिक हनुमान चालिसा पाठ गुरुवारपासून (ता. २६) सुरू होणार आहे. २ एप्रिलपर्यंत हे पाठ दररोज रात्री ८ त
छ.संभाजीनगर : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण


छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च (हिं.स.)।श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ज्योतिनगर येथील श्री महावीर हनुमान मंदिर व श्री विठ्ठल मंदिर परिसरात संगीतबद्ध सामूहिक हनुमान चालिसा पाठ गुरुवारपासून (ता. २६) सुरू होणार आहे. २ एप्रिलपर्यंत हे पाठ दररोज रात्री ८ ते १० या वेळेत होईल. जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हनुमान जन्मोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या हनुमान जन्मोत्सव २०२६ निमित्त ज्योतिनगर येथील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे होणार आहे. अंतर्गत २७ मार्च ते २ एप्रिलदरम्यान दररोज सायंकाळी पाचपासून वेदशास्त्रसंपन्न गणेश बुवा रामदासी यांच्या वाणीतून रामकथा होणार आहे. २ एप्रिला सकाळी महापूजा व त्यानंतर महाआरती होणार आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande