
बीड, 25 मार्च (हिं.स.)।
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा तांत्रिक सेवेतील विस्तार अधिकारी (शिक्षण) या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील विस्तार अधिकाऱ्यांना उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्यातील एकूण ५१ विस्तार अधिकाऱ्यांपैकी १२ विस्तार अधिकारी बीड जिल्ह्यातील आहेत.
जिल्हा तांत्रिक सेवेतील विस्तार अधिकारी शिक्षण गट (क) श्रेणी-२ या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखामधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यासाठी सन २०२५-२६ या निवड सूचीला सामान्य प्रशासन विभागाची मान्यता मिळली आहे.
पदोन्नती मिळालेल्यांमध्ये धनंजय मारुती बोंदार्डे, भगवान सोपानराव सोनवणे, रंगनाथ नामदेव राऊत, धनंजय रामराव शिंदे, ऋषिकेश जनार्दन शेळके, मोहन त्रिंबक काकडे, नानाभाऊ गणपती हजारे, हनुमान गहिनीनाथ गव्हाणे, हिना उमर अन्सारी, बाबासाहेब यमाजी उजगरे, प्रणिता पंढरीनाथ कापसे, मधुकर शामराव सुवर्णकार, खान समंदर आमिर खान यांचा समावेश आहे. राज्य शासनाने उपशिक्षणाधिकारीपदी निवडलेल्या ५१ विस्तार अधिकाऱ्यांना लवकरच पदस्थापना देण्यात येणार आहे. महसूल विभागनिहाय रिक्तपदांची संख्या लक्षात घेऊन या नियुक्त्या देण्यात येणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis