नांदेड : लोहा शहरात ३० ठिकाणी सार्वजनिक शौचालय
नांदेड, 25 मार्च (हिं.स.)।लोहा नगर पालिका निवडणूक काळात शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालय उभारण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याची पूर्तता केली जात असून शहरात ३० अद्यावत शौचागृह उभारले जाणार आहेत. शिवाय जुन्या शहरातील सिमेंट रस्ता सुरू आहे तर चौकाचे सुश
नांदेड : लोहा शहरात ३० ठिकाणी सार्वजनिक शौचालय


नांदेड, 25 मार्च (हिं.स.)।लोहा नगर पालिका निवडणूक काळात शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालय उभारण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याची पूर्तता केली जात असून शहरात ३० अद्यावत शौचागृह उभारले जाणार आहेत. शिवाय जुन्या शहरातील सिमेंट रस्ता सुरू आहे तर चौकाचे सुशोभिकारण लवकरच पूर्णत्वास जाणार आहे . लवकर शहरातील प्रभागात विविध कामे सुरू होणार आहेत असे प्रतिपादन विधिमंडळ विधिउपसमितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

लोहा शहरात स्वच्छ भारत मिशन योजनेतून लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, जिल्हा परिषद हायस्कूल या भागात ३० शौचालय व मुतारीगृह, स्नानगृह उभारण्यात येणार आहे . त्या कामाचे भूमीपूजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याचा हस्ते वीज वितरण कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, माजी सभापती खुशाल पाटील यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

आ .प्रतापराव पाटील यांनी नगर पालिका निवडणुकीत शहरवासीयांना जे आश्वासन दिले होते .त्यात सार्वजनिक शौचालय उभारणी याच समावेश होता .लोकमान्य नगराध्यक्ष शरद पवार, यांनी पदभार स्विकारल्या नंतर शंभर दिवस अजून झाले नाहीत पण त्याची टीम चागले काम करत आहे.आमदार प्रतापराव याच्या हस्ते शहरातील ३० स्वच्छतागृहाचे भूमिपूजन करण्यात आले .

याप्रसंगी त्यांनी शहरवासीयांनी दिलेल्या आश्वासनपूर्ती केली जात असून या सार्वजनिक शौचालयामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी या निमित्ताने पूर्णत्वास जात आहे . जुन्या शहरात जाणार सिनेट रस्ता मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर नगराध्यक्षा मातोश्री जिजाबाई मुकदम यांच्या काळात झाला होता पुन्हा आमच्याच कार्यकाळात प्रशस्त सिमेंट रोड होतो आहे. मुख्य चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळा समोरील गोलाईत आकर्षक सुशोभीकरण लवकरच पूर्ण होणार आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande